छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार “जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

रायगड(जिमाका)दि.19:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'जय शिवाजी, जय भवानी', 'हर हर महादेव' जय शिवाजी जय भारत अशा जयघोषात आज रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित भव्य जय शिवाजी जय भारत पद यात्रा मोठया उत्साहात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या जिल्ह्यात या पदयात्रेचे अतिशय दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथून “ जय शिवाजी जय भारत ” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला प्रेरणा देण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपण पुढे न्यायची आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले...