
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी रायगड (जिमाका) दि. 11 :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. तसेच विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 (Sukhoi) विमानानेही यशस्वी टेक ऑफ केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणाऱ्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रिय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष, संजय शिरसाट,खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे,खा.डॉ. श्रीकांत शिंदे, खा.नरेश म्हस्के, आ. गणेश नाईक,आ. प्रशांत ...