गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आरोग्य सुविधांसह सज्ज
अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.10 सप्टेंबर 2021 पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.18 व क्र.4 वरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होते. यावेळी अपघात होवून जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक पुरेशा औषध साठा व रुग्णवाहिकेसह सुसज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात नेमलेल्या वैद्यकीय मदत पथकांची माहिती पुढीलप्रमाणे- हमरापूर :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.दिक्षिता मोकल, मो.9028286605, आ...