स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान सीएसआयआर-सीआरआरआय महामार्ग बांधणीसाठी विकसित केलेले मजबूत आणि पर्यावरणास अनुकूल असे तंत्रज्ञान -- सदस्य निती आयोग डॉ.व्ही.के.सारस्वत.

रायगड,दि.13 (जिमाका) :- "स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान हे CSIR- सेन्ट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालया द्वारे विकसित केलेले तंत्रज्ञान आहे, जे स्टील उद्योगातील वेस्ट चे वेल्थ मध्ये परिवर्तन करत आहे व हे तंत्रज्ञान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास संपूर्ण देशात टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात मदत करेल, असे प्रतिपादन सदस्य निती आयोग डॉ.व्ही.के. सारस्वत यांनी आज येथे केले. NH-66 मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड सेक्शनच्या उद्घाटन प्रसंगी वेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य महाव्यवस्थापक तथा प्रादेशिक अधिकारी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुंबई अंशुमाली श्रीवास्तव, जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जी.एस.राठोड, प्रकल्प संचालक तथा प्रमुख शास्त्रज्ञ, सीएसआयआर-सीआरआरआय सतीश पांडे, सीएसआयआर-सीआरआरआय संचालक डॉ.मनोरं...