अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.5 :- जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विधानसभा सदस्य तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती रिना घरत, श्रीमती वृषाली वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आ.ठाकूर यांनी विविध विभागांचा सन 2017-18 मध्ये झालेल्या खर्च, सन 2018-19 मधील मंजूर नियतव्यय व सन 2019-20 मधील प्रस्तावित निधी यांचा आढावा घेतला. सन 2018-19 मधील सर्व मंजूर निधी खर्ची पडेल याकरीता सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. जेण...