माझं मत, माझा महाराष्ट्र या माध्यमातून कर्जत तालुक्यात स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून मतदार जनजागृती

रायगड अलिबाग दि.10 :- भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, डॉ. विजय सूर्यवंशी-, उपजिल्हाधिकारी निवडणूक वैशाली माने, नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, सुनिल जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विधानसभा मतदार संघ वैशाली परदेशी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत विक्रम देशमुख यांच्या सहकार्याने "विधानसभा निवडणूक मतदान जनजागृती अभियान" या विषयावर कर्जत विधानसभा मतदार संघात चित्ररथ फिरवून मतदान जागृती केली. स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी पथनाट्यातून दहिवली, कर्जत पोलीस स्टेशन, कपालेश्वर मंदिरा समोर, कर्जत रेल्वे स्टेशन, मच्छीगल्ली, धापया मंदिरा शेजारी, कर्जत नगर परिषदेसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर, ...