मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना
अलिबाग दि .15, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत (CMEGP) राज्याच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी महत्वाकांक्षी योजना जिल्हा उद्योग केंद्र , रायगड अलिबाग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ , रायगड अलिबाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे . मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार व सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरु केली आहे . जिल्ह्यातील युवक - युवतींच्या औद्योगिक प्रगतीसाठी प्रथमच सुरु केलेल्या या योजने द्वारे कृषी व कृषीवर आधारीत उद्योग , उत्पादन व सेवा आदी उद्योग प्रकल्पांसाठी संबंधितांची निवड केली जाणार आहे . यामध्ये उत्पादन उद्योगांकरीता रु .50 लाख व सेवा उद्योगांकरीता रु .10 लाखांपर्यंत अर्थसहाय्य केले जाते . यामध्ये शासनमार्फत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 25 ते 35 टक्के व शहरी भागातील लाभार्थ्यांकरीता 15 ते 25 टक्के अनु...