Posts

निवृत्ती वेतनधारकांसाठी (MAHA-UPLABDHI) एकात्मिक मोबाईल ॲप विकसित जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा

    रायगड-अलिबाग दि.15(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नस सुधारणा अंतर्गत वित्त विभागाचे अधिनस्त असलेल्या संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई यांनी राज्यात सर्व कोषागार कार्यालयामधून निवृत्तीवेतन,कुटुंबनिवृत्तीवे तन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांसाठी (MAHA-UPLABDHI) हे एकात्मिक मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दिपक बोडके यांनी केले आहे.  या ॲपद्वारे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध सेवा सुलभ,जलद आणि पारदर्शक पध्दतीने मोबाईलद्वारे उपलब्ध करुन देणे हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे.  हे ॲप Android व Ios या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच मोबाईल ॲप संदर्भात काही अडचण असल्यास, निवृत्तीवेतन धारकाचे नाव,पीपीओ क्रमांक,निवृत्तीवेतन जमा होत असलेली बँक व शाखा, निवृत्तीवेतन जमा होत असलेला बँक खातेक्रमांक,मोबाईल क्रमांक (Android/ smart phone) ही माहीती कोषागार कार्यालयाच्या  topension-raigad@mah.gov.in ईमेल वर देण्या...

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्रे व श्रवण यंत्रांचे वाटप

Image
    रायगड-अलिबाग दि.15(जिमाका):राज्यात दि.17 सप्टेंबर ते दि.17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ जिल्हा शासकीय रुग्णालय, अलिबाग येथे ‘दिव्यांगजन सहयोग उपक्रम’ राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते 10 दिव्यांग लाभार्थींना दिव्यांग प्रमाणपत्रे तर 2 लाभार्थींना श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती मते, दिव्यांग विभागाचे सहाय्यक सल्लागार साईनाथ पवार उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘सेवा माझे योगदान’ या आरोग्यविषयक सेवा उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या आरोग्यविषयक आणि सामाजिक गरजांसाठी सहकार्य उपलब्ध करून देणे हा होता. दिव्यांग प्रमाणपत्रांमुळे पात्र लाभार्थींना विविध शासकीय योजना व सुविधांचा लाभ घेण्यास मदत होते. तसेच श्रवण यंत्रांच्या वितरणामुळे श्रवणदोष असलेल्या ...

नागरिकांना अखंडित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा करा-पालकमंत्री भरत गोगावले रोहित्रांची क्षमता वाढवा; नवीन विद्युत उपकेंद्रे उभारण्यासह सौरऊर्जा योजनांना गती द्या

Image
    रायगड-अलिबाग, दि.12(जिमाका): जिल्ह्यातील नागरिकांना अखंडितपणे, योग्य दाबाने आणि विनाअडथळा वीजपुरवठा होण्यासाठी विद्युत वितरणाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन रोहित्रांची क्षमता वाढवावी, आवश्यकतेनुसार नवीन विद्युत उपकेंद्रे प्रस्तावित करावीत आणि दुर्गम तसेच डोंगराळ भागातील नागरिकांनाही नियमित वीजपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी. विद्युत वितरणाबाबत नागरिकांच्या तक्रारी उद्भवणार नाहीत, यासाठी यंत्रणेने तत्परतेने काम करावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात विद्युत वितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक उपस्थित होते. रोहित्रांची क्षमता वाढवा; नवीन उपकेंद्रांचे नियोजन करा वाढत्या वीजवापरामुळे विजेची मागणी...

दुष्काळी परिस्थितीच्या संकटावर एकजुटीने मात करूया; दुष्काळ निवारणाच्या कामे प्राधान्याने करा –पालकमंत्री भरत गोगावले उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करत पिण्याच्या पाण्याचा सर्वोच्च प्राधान्य द्या

Image
    रायगड-अलिबाग, दि.12 (जिमाका) :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने आणि सर्वांच्या समन्वयातून पूर्ण करा. उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्या आणि नागरिकांसह जनावरांनाही पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्या. दुष्काळी परिस्थिच्या या संकटावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकजुटीने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश राज्याचे फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दुष्काळसदृश परिस्थिती, पीक पाहणी आणि संभाव्य पाणीटंचाईवरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अधिकारी मंगेश वाकडीकर, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे आदी उपस्थित होते. ...

कर्जत येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न

Image
    रायगड-अलिबाग,दि.07(जिमाका): सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला व बाल विकास विषयक जनजागृती  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, भालिवडी, ता. कर्जत येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.    यावेळी कौटुंबिक हिंसाचार कायदा, बालसंगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र, हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रकल्पांची विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. या उपक्रमात सुमारे 550 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमास आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती तेजस्विनी गलांडे, जिल्हा सल्लागार समिती सदस्य श्रीमती वैशाली पाटील, संशोधन अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री. अविनाश बदे, चाईल्ड हेल्पलाईनच्या श्रीमती निलाक्षी दगडे, कर्जत तालुका सहाय्यक संरक्षण अधिकारी श्रीमती अस्मिता खंडागळे, पेण प्रकल्पांतर्गत बचत गट, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ...

टीबीमुक्त जिल्ह्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत -- जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
    रायगड-अलिबाग,दि.6(जिमाका): राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष किशन  जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी केले. या बैठकीस जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनिषा चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयेश गोसावी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी, WHO Consultant ठाणे सर्कल डॉ. ज्योती साळवे, MO ART Centre डॉ. संदीप रेस्वाल, डापकूचे संजय माने, PLHV प्रतिनिधी संघटना पनवेलच्या प्रिया नारखेडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक स्तर अलिबाग रेश्मी साळुंखे, वैद्यकीय अधिकारी DTC अलिबाग डॉ. सुरेश ठोकळ व डॉ. अक्षयराज राठोड, तसेच दंतराव सतीश, सुभाष भोजने आणि धनंजय पाटील यांच्यासह  सर्व तालुका आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग...

महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढा--जिल्हाधिकारी किशन जावळे महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
   रायगड-अलिबाग,दि.6(जिमाका): वर्षा नुवर्षे महसूल विभागाकडे प्रलंबित असलेली छोटी-मोठी प्रकरणामध्ये किरकोळ कारणांमुळे वाद वाढवत नेल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च होते. पक्षकारांनी महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून परस्पर सामोपचाराने, संवादातून आणि सलोख्याच्या भूमिकेतून ही प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.      जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.      यावेळी अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.अनंत पाटील (प्रभारी), ॲड. मच्छिंद म्हात्रे आणि मोठ्या संख्येने पक्षकार  उपस्थित होते.      जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, अनेक वेळा जमिनीचा वाद, मालमत्तेशी संबंधित छोटासा प्रश्न किंवा इतर किरकोळ कारणांमुळे पक्षकारांमध्ये वाद निर्माण होतो. पूर्वजांची समान मालमत्ता किंवा एकच कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये निर...