Posts

Showing posts from March 8, 2026

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता दि.17 मार्च रोजी पनवेल येथे पंडित दीन दयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

    रायगड-अलिबाग,दि.13(जिमाका):-   जिल्हा कौशल्य विकास ,  रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड - अलिबाग  व  महाराष्ट्र भूषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पनवेल  यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. 17 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पनवेल.जुना मुंबई-पुणे हायवे , गांधी हॉस्पिटलसमोर, बसस्थानकजवळ, ता.पनवेल   येथे  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित  करण्यात आला असून जिल्ह्यातील  जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रायगड-अलिबागच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार   यांनी केले आहे. जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या / ॲप्रेंटिसशिपची  भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाण...

खेळाडूंना शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक माहितीकरिता खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in/ वर भेट द्यावी

    रायगड-अलिबाग,दि.12 (जिमाका):- राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने 'क्रीडा ई-प्रमाण' ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. यासाठी खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला  https://sports.maharashtra. gov.in/  भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत करण्यात येत आहे.      आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावर त्या माहितीची शहानिशा करून सदर अभिलेख पोर्टलवर अद्ययावत करण्याची कार्यवाही केली जाईल. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी  https://sports.maharashtra. gov.in/  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्यानंतर त्याबाबतची माहिती त्वरीत याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.     प्रणालीच...

तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पद भरतीकरिता इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत

    रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका):-  तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील इच्छूक माजी सैनिक उमेदवारांनी  https://mmrda.maharashtra.gov. in  (Division  →  Administration  →  Recruitment) या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) यांनी केले एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वांद्रे, (पुर्व) मुंबई आस्थापनाकडील दि.04 मार्च 2026 च्या पत्राअन्वये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई यांनी तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील सरळसेवेकरिता रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात मुं.म.प्र.वि.प्राधिकरणाच्या  https://mmrda.maharashtra.gov. in  (Division Administration  →→  Recruitment) या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच मुं. म. प्र. वि. प्राधिकरण यांनी दि. 18/02/2026 रोजी दैनिक टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी व सकाळ या मराठी वृत्तपत्रात...

घरगुती गॅस पुरवठा नियमित, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम राखावा

    रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका):-  सध्या जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तथापि, तालुक्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही, अशी माहिती तहसिलदार रोहा डॉ.किशोर देशमुख यांनी दिली आहे. घरगुती वापरासाठी वितरित करण्यात येणारा एलपीजी गॅस केवळ घरगुती कारणांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. काही ठिकाणी घरगुती गॅसचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार व भारत पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोरेशन लिमिटेड या तेल विपणन कंपन्यांच्या नियमानुसार साठेबाजी व काळाबाजार रोखण्याकरीता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दोन बुकिंगमध्ये किमान 25 दिवसांचा कालावधी असणे आवश्यक आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर 25 दिवस पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलेंडरचे ब...

सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरती परीक्षा होणार 23 मार्च रोजी

रायगड-अलिबाग,दि.12(जिमाका):-  सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपीक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरिता टिसीएस-आयओएन यांच्यामार्फत दि. 14 मार्च 2026 रोजी होणारी ऑनलाईन परीक्षा या दिवशी पोलीस भरती परिक्षा असल्याने दि.23 मार्च 2026 रोजी दुपारी 01.00 ते 03.00 या कालावधीत होणार आहे, याची सबंधितांना याची नोंद घ्यावी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे. 00000  

80 वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज सादर करावा

रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):  शासनाच्या 80 वर्षे व त्यावरील निवृत वेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतनात वाढ करण्यासाठी जन्मदाखला, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या बँक शाखा प्रमुखाचे प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय आस्थापनांचे प्रमाणपत्र, सेवा पुस्तकातील नोंद, ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना,भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी इत्यादी (यापैकी कोणताही एक पुरावा) कोषागार कार्यालयात सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांनी केले आहे.  80 वर्षे व त्यावरील लाभ मिळण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात अर्ज सादर करण्यात यावा.  तसेच अर्जामध्ये बँकेचे नाव, खाते क्रमांक, पीपीओ क्रमांक नमूद करावा. वयाचा पुरावा सोबत जोडण्यात यावा.  ज्या निवृत्तीवेतनधारकांना 80 वर्षाचा लाभ मिळत आहे त्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत.  तसेच अधिक माहितीकरिता रायगड जिल्हा कोषागार कार्यालयाकडे संपर्क साधावा. 0000000

महाडमध्ये साहित्याचा जागर दोन दिवसीय रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2026 उत्साहात संपन्न होणार

    रायगड-अलिबाग,दि.09 (जिमाका):  ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने 'ग्रंथोत्सव 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे गुरुवार, दि.12 आणि शुक्रवार, दि.13 मार्च 2026 रोजी हा ज्ञानोत्सव रंगणार आहे.      ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, गुरुवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता भव्य ग्रंथदिंडी निघणार आहे. महाडचे नगराध्यक्ष सुनिल कविस्कर, उपविभागीय अधिकारी पोपटराव ओमासे आणि उपनगराध्यक्ष संदिप जाधव यांच्या शुभहस्ते या दिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी ग्रंथालय संचालक  अशोक गाडेकर, सहायक ग्रंथालय संचालक प्रशांत व. पाटील, पोलीस उपअधीक्षक शंकरराव भा. काळे, श्रीमती शोभाताई सावंत, श्रीमती सीमाताई मपारा,  गंगाधर साळवी आणि प्रकाश जमदाडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.    ...