Posts

Showing posts from March 22, 2026

मेरा युवा भारत अंतर्गत पी.एन.पी कॉलेज येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

    रायगड-अलिबाग, दि.23 (जिमाका):-  मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एन.पी. कॉलेज वेश्वी, अलिबाग येथे (दि.21 मार्च रोजी) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां संपन्न झाल्या. यावेळी चित्रलेखा पाटील- कार्यवाह पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटी अलिबाग, अमित पुंडे - जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत, तपस्वी नंदकुमार गोंधळी - राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था, सुचिता साळवी - संचालिका स्पर्धा विश्व अकॅडमी, क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, यतीराज पाटील, पंच पुरुषोत्तम पिंगळे, नंदकुमार वरसोलकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उपस्थित बहुसंख्य खेळाडूंना शुभेच्छा व मार्गदर्शन करताना खेळाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिले.  तसेच चित्रलेखा पाटील यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त खेळाडू  पुढे यावेत याकरिता खेळाडूंना नेहमीच सहकार्य क...

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

  रायगड-अलिबाग, दि.23 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) लघुलेखन परीक्षा व ऑनलाईन दरवर्षी जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. माहे जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दि.10 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कागा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://mahaamrut.org.in/ ) ऑनलाईन पद्धतीने अर्ज दि. 30 एप्रिल, 2026 पर्यंत मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जासोबत  गत आर्थिक वर्षाचे (सन 2025-26) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन 2026-27) लागू असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र,  राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Do...

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार- डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा

    रायगड-अलिबाग, दि.23 (जिमाका):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्क मिळवून देण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. तो लढा समतेसाठी, स्वाभिमानासाठी न्यायासाठी होता. या समतेच्या संगराला पुढील वर्षी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्त वर्षभर सामाजिक न्याय विभागाच्यामार्फत समतेचा जागर सुरू राहणार, असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी केले.               डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने महाड येथील राष्ट्रीय स्मारकामध्ये बार्टीच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.                 या लढ्यात सर्व जातीधर्मातील लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. चवदार तळ्याचा लढा हा मानव मुक्तीचा होता. चवदार तळ्यातील पाणी स्वच्छ करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ५५ कोटी रुपये मंजूर केले असून ते पाणी जल शुद्ध प्रकल्पाद्वारे  शताब्दी...