शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

 

रायगड-अलिबाग दि.25 (जिमाका) :-  भारतात दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो 1931 मध्ये याच दिवशी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तीन थोर क्रांतिकारकांना लाहोर जेलमध्ये ब्रिटिश सरकारने फाशी दिली होती त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी दिलेल्या त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो. तरुणांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत करण्याकरिता तसेच क्रांतिकारकांचे बलिदान स्मरणात ठेवणे आणि त्यांच्या त्यागाला अभिवादन करणे याकरिता मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय, भारत सरकार, रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या सहकार्याने व अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत रायगड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पदयात्रेचे आयोजन अलिबाग मध्ये केले होते.  यावेळी भारत माता की, जय, शहीद जवान,अमर रहे, वंदे मातरम, या घोषणांचा  जयघोष करण्यात आला. पदयात्रेत स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका तथा स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी,  स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक- युवती, ग्रामस्थ सहभागी झाले होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन