संकटात धावला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कर्करोगाच्या उपचारासाठी भरीव मदत
रायगड-अलिबाग (जिमाका)दि. 5 : रायगड जिल्ह्यातील महाड येथील 42 वर्षीय मयूर चांदुरकर यांना कर्करोगाचे निदान झाले. उपचार खर्चाचा प्रश्न निर्माण झाला होता. बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने कुटुंबीयांपुढे मोठे संकट उभे राहिले. अशावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेत आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्यावर आवश्यक उपचार करणे शक्य झाले. मयूर चांदुरकर यांना मागील 9 ते 10 वर्षांपासून किडनी संबंधित आजाराचा त्रास होता. अचानक त्यांचे वजन कमी होऊ लागले आणि अशक्तपणा वाढू लागला. प्रकृती खालावत असल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. रक्त चढवूनही हिमोग्लोबिन स्थिर राहत नसल्याने डॉक्टरांनी पुढील तपासण्या केल्या. त्यातून चांदुरकर यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. रायगड जिल्ह्यातील महाड येथील मयूर चांदुरकर हे किरकोळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरी वृद्ध आई-वडील, आजी, पत्नी आणि दोन अपत्ये अशी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत कर्करोगाच्या उपचारासाठी लागणारा सुमारे 15 ते 18 ला...