Posts

Showing posts from June 21, 2026

जिल्ह्यात 28 जून रोजी शिक्षक पात्रता (MAHA-TET) परीक्षा

                 रायगड-अलिबाग,दि.23(जिमाका):- महा राष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2026 चे आयोजन रविवार, दि. 28 जून रोजी करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण 9 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यात पेपर-1 साठी 4 हजार 432 आणि पेपर-2 साठी 5 हजार 771 असे एकूण 10 हजार 203 उमेदवार परीक्षा देणार आहेत. परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन, हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित देखरेख व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजेपर्यंत तर ...

अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची “अमृत” मार्फत सुवर्णसंधी!

    रायगड-अलिबाग,दि.23(जिमाका):- मानस मित्र प्रशिक्षण नेमकं काय आहे? विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य , भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) यांच्या वतीने " अमृत मानसमित्र " समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे . या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे . हा अभ्यासक्रम मानसिक आरोग्य , विद्यार्थी समुपदेशन , भावनिक आधार , संवाद कौशल्ये , Active Listening, सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद , संकट व्यवस्थापन , जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर आधारित असून सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे . 15 दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण , अधिकृत प्रमाणपत्र , फील्ड प्लेसमेंट व रोजगारक्षम कौशल्य विकासाची संधी  हे प्रमु...

महाड शहरातील नवीपेठ महाड पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकता इच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

                   रायगड-अलिबाग,दि.23(जिमाका ):- भारतीय डाक विभागास नवीपेठ महाड पोस्ट ऑफिसठी महाड शहरात साधारण ३०० ते ५५० चौ. फूट जागेची आवश्यकता आहे. इच्छुकांनी भाड्याच्या अपेक्षित रकमेच्या उल्लेखासहित आपले लेखी अर्ज अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग या पत्त्यावर दि. ०६ जुलै २०२६ दुपारी ३.३० वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन डाक अधीक्षक रायगड मंडल अलिबाग यांनी केले आहे. जागेसंबंधीच्या प्रमुख अटी – पोस्ट ऑफिससाठी ३०० ते ५५० स्क्वेअर फूट सुव्यवस्थित असलेली जागा पाहिजे. पोस्ट खाते सुचवेल त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा, दुरुस्त्या स्वखर्चाने करून घ्याव्या लागतील. त्यासाठी कोणतीही उचल (Advance) खात्याकडून मिळणार नाही.  इमारतीत स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटर, पाण्याचे नळ कनेक्शन, संडास बाथरूम व प्राथमिक सुविधा असणे आवश्यक आहे. घर मालकास ०५ वर्षे मुदतीचा करारनामा स्वखर्चाने करून घ्यावा लागेल. 00000

६ जुलै रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

               रायगड-अलिबाग,दि.23(जिमाका ):- सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. त्यानुसार जिल्हास्तरावरील माहे जुलै २०२६ चा लोकशाही दिन सोमवार दि.६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १.०० वा. जिल्हाधिकारी कार्याकायच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. अर्जदाराने आपल्या वैयक्तिक  स्वरुपाच्या तक्रारीचे निराकरण करण्याकामी लोकशाही दिनाकरिता अर्ज विहित नमुन्यात १५ दिवस आधी २ प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. अर्जदारांनी प्रथम तालुकास्तरावर तहसिल कार्यालयाकडे लोकशाही दिनात अर्ज सादर करावा. तालुकास्तरीय लोकशाही दिनात ३० दिवसात  कार्यवाही न झाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करता येईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे  यांनी कळविले आहे. 000000