महाड शहरातील नवीपेठ महाड पोस्ट ऑफिससाठी जागेची आवश्यकता इच्छुकांनी लेखी अर्ज सादर करावेत

 

 

              रायगड-अलिबाग,दि.23(जिमाका):- भारतीय डाक विभागास नवीपेठ महाड पोस्ट ऑफिसठी महाड शहरात साधारण ३०० ते ५५० चौ. फूट जागेची आवश्यकता आहे. इच्छुकांनी भाड्याच्या अपेक्षित रकमेच्या उल्लेखासहित आपले लेखी अर्ज अधीक्षक डाकघर रायगड विभाग अलिबाग या पत्त्यावर दि. ०६ जुलै २०२६ दुपारी ३.३० वाजेपर्यंत पाठवावेत असे आवाहन डाक अधीक्षक रायगड मंडल अलिबाग यांनी केले आहे.

जागेसंबंधीच्या प्रमुख अटी – पोस्ट ऑफिससाठी ३०० ते ५५० स्क्वेअर फूट सुव्यवस्थित असलेली जागा पाहिजे. पोस्ट खाते सुचवेल त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा, दुरुस्त्या स्वखर्चाने करून घ्याव्या लागतील. त्यासाठी कोणतीही उचल (Advance) खात्याकडून मिळणार नाही.  इमारतीत स्वतंत्र इलेक्ट्रिक मीटर, पाण्याचे नळ कनेक्शन, संडास बाथरूम व प्राथमिक सुविधा असणे आवश्यक आहे. घर मालकास ०५ वर्षे मुदतीचा करारनामा स्वखर्चाने करून घ्यावा लागेल.

00000

Comments