रायगडमध्ये 14 फेब्रुवारीला शासकीय योजनांचा महामेळावा विधी सेवा शिबिर, एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध
रायगड-अलिबाग,दि.10(जिमाका):- सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 14 फेब्रुवारी 2026 रोजी अलिबाग येथील कुरूळ येथील आरसीएफ हॉल येथे भव्य ‘विधी सेवा शिबिर व विविध शासकीय योजनांचा महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महामेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि त्यांना योजनांचा थेट लाभ मिळवून देणे हे आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा न्यायालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडणार असून, कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलिस अधीक्षक आँचल दलाल आदी उपस्थित राहून म...