पनवेल येथे विविध विकासकामांचा शुभारंभ लोकप्रतिनिधी व प्रशासन विकासाची दोन चाके - पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3 :- शेवटच्या व्यक्तिपर्यंत विकास पोहोचण्यासाठी विकासाच्या रथाची दोन्ही चाके म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी एकत्र काम केले, तरच फायदा होतो याचा प्रत्यय पनवेलच्या नागरिकांना येत आहे,असे प्रतिपादन राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 2) पनवेल येथे केले. पालकमंत्री ना.चव्हाण यांच्या हस्ते पनवेल मनपा हद्दीतील 96 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, राजू सोनी, सभापती लीना गरड, नगरसेविका चारुशीला घरत, मुग्धा लोंढे, दर्शना भोईर, नगरसेवक नितिन पाटील, अनिल भगत, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, पं. स. सदस्या रत्नाताई घरत, जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मा...