राज्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26 :- सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी (Mahadbt) पोर्टल दि. 01.10.2018 पासून नव्याने कार्यान्वीत झाली असून https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळाचा वापर करून अ. जा, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रिशिप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केले आहेत. सदर अर्ज  संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करून जिल्हातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेसाठी  सादर करण्यात यावेत. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर जिल्हयातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून ऑनलाईन मान्यता देण्यात येईल.
महाविद्यालय स्तरावरील शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परिक्षा शुल्काच्या प्रलंबित अर्जाबाबत
सद्यस्थितीत महाविद्यालय स्तरावर अद्यापही सुमारे 15% अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना फॉरवर्ड करून तात्काळ निकाली काढण्यात यावेत.
महाडिबीटी पोर्टल वरील विद्यार्थ्यांनी / महाविद्यालयांनी
अर्ज मंजुर होण्यापुर्वी रदद (Cancel) केलेल्या अर्जाबाबत
नोंदणीकृत झालेल्या अर्जापैकी सुमारे 20% अर्ज विद्यार्थ्यानी अथवा महाविद्यालयाने अर्ज मंजुर होण्यापुर्वी त्यांच्या स्तरावरून अर्ज रदद (Cancel) केलेले आहेत. सदर रदद केलेल्या अर्जांपैकी पात्र असलेल्या अर्जांची त्वरीत त्रृटी पुर्तता करून असे अर्ज विद्यार्थ्यांनी पुनश्च ऑनलाईन सादर करावेत व महाविद्यालयांनी  संबंधित लॉगीनवरून मान्य करून पुढील कार्यवाहीस्तव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे ऑनलाईन फॉरवर्ड करावेत.
महाडिबीटी  पोर्टल वरील मान्य झालेल्या अर्जांची यशस्वी वितरण (Redemption) प्रक्रिया करणेबाबत
सदर पोर्टलवर मान्य झालेली अर्जाची अदायगीची प्रक्रिया यशस्वी होणेकरिता विद्यार्थ्याच्याच लॉगईनमधून रिडम्शन प्रक्रिया (Redemption) करणे अत्यावश्यक आहे. सदर ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण न केल्यास मान्य झालेली विद्यार्थी व महाविद्यालयाची शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत  होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यानी व पालकांनी नोंद घ्यावी .
* रिडम्शन व्हाउचर जनरेट झाले असून देखील रिडम्शन प्रक्रिया न केलेल्या विद्यार्थ्यावर महाविद्यालयाने त्यांच्यास्तरावर योग्य ती कारवाई  करावी.
* विद्यार्थ्याचे बॅक खाते क्रमांक प्रणालीमध्ये अचूक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
* नोंदणीकृत केलेले बॅक खाते क्रमांक आपल्या आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
* अदायगीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक स्तरावर एस. एम. एस (SMS) येणेस्तव मोबाईल क्रमांक हा आधार तसेच नोंदणीकृत बॅक खात्याशी संलग्न असून तो अदयावत असणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने आपणांस आवाहन करण्यात येते की उपरोक्त दिलेल्या सुचनांचे पालन न केल्यास व शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या व महाविद्यालयाच्या बॅक खात्यावर न जमा झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व प्राचार्य व विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी.
आपल्या स्तरावरून सदर जाहीर आवाहन महाविद्यालयाच्या  मुख्य सुचना फलक तसेच आवश्यकता असल्यास परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात यावेत.
 महाविद्यालयांसाठी विशेष सुचना
आपल्या महाविद्यालयातील / विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी  (UR,GS,SR) यांना आपल्या स्तरावरून उपरोक्त सुचना विविध माध्यमातून विद्यार्थ्याना त्वरेने कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक