कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
अलिबाग,दि.28(जिमाका) :- सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि.12 जानेवारी 2022 रोजी मार्गदर्शक सूचनानुसार
नागरिकांनी कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड
अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करावी. तसेच ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य
यंत्रणेला कळवावे व त्वरीत योग्य ते उपचार घ्यावेत. आरोग्य यंत्रणेने ही कीट नागरिक
जास्तीत जास्त वापरतील व चाचणी पॉझिटीव्ह आल्यास तात्काळ शासकीय यंत्रणेला कळवतील,
यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सर्व मेडीकल स्टोअरवरील विक्रेत्याने या कोरोना
चाचणी कीट वापराबाबत नागरिकांना मागर्दशन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment