निर्मल गणेशोत्सवांतर्गत वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबीर संपन्न

अलिबाग, दि.26 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग तहसिलदार कार्यालय व माणुसकी प्रतिष्ठान, अलिबाग आयोजित निर्मल गणेशोत्सवांतर्गत आज दि.26 ऑगस्ट 2022 रोजी माध्यमिक शाळा, वायशेत येथे विद्यार्थ्यांना मातीपासून घरगुती गणपती कसे तयार करावेत, याचे प्रात्यक्षिक शिबीर आयोजित करण्यात आले होते. मौजे थळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री.एकनाथ थेरोंडेकर यांनी मातीपासून घरच्या घरी गणेशमूर्ती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, श्री.विशाल आढाव, श्री.गौरव माळी, तहसील कार्यालय अलिबागचे श्री.पवन मस्के, शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. याप्रसंगी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती वापरण्याचा निर्धार विद्यार्थी व उपस्थितांनी व्यक्त केला. 00000