जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम अभियानाचे आयोजन आशा सेविका व स्वयंसेवक जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना देणार भेटी; एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे होणार सर्वेक्षण
रायगड-अलिबाग,दि.(जिमाका):- रायगड जिल्ह्यात दि.17 नोव्हेंबर ते दि.02 डिसेंबर 2025 या कालावधीत "कुष्ठरोग शोध मोहीम अभियान" राबविण्यात येणार असून 2027 पर्यंत जिल्हयात कुष्ठरोग्याची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात "शून्य कुष्ठरुग्ण प्रसार" हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासन काम करीत आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येचे 100 टक्के व शहरी भागातील जोखीमग्रस्त 30 टक्के लोकसंख्येचे प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण 5 लाख 6 हजार 841 घरांना आशा सेविका व स्वयंसेवक भेटी देणार असून एकूण 23 लाख 30 हजार 871 लोकसंख्यंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. मोहिमेचा उद्देश :- समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार ...