उद्योजकता विकास व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न

 

रायगड-अलिबाग,दि.11 (जिमाका):-महाराष्ट्र राष्ट्र सेंटर फॉर एंटस्पेनरशिप डेव्हलपमेंट (MCED) आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या संयुक्त विद्यमाने 21 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम तसेच 2 दिवसीय ध्येय कृतीत आणण्यासाठी अभि प्रेरणा प्रशिक्षण (Achievement & Motivational Training) पनवेल येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले असून या उपक्रमाला पनवेल व आसपासच्या भागातील लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

21 दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये नवउद्योजकांना व्यवसाय उभारणी, उद्योग विस्तार, मार्केटिंग धोरणे, वित्तीय व्यवस्थापन, बाजारपेठ विश्लेषण आणि डिजिटल साधनांचा वापर या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी लाभार्थ्यांना त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या संधी ओळखणे, योजनाबद्ध पद्धतीने व्यवसाय वाढविणे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचे कौशल्य विकसित करण्यात आले.

अलिबाग येथे पार पडलेल्या 2 दिवसीय ध्येय कृतीत आणण्यासाठी अभि प्रेरणा प्रशिक्षण (Achievement & Motivational Training) मध्ये सहभागींना स्व-उत्कर्ष, लक्ष्य निर्धारण, नेतृत्वगुण, आत्मविश्वास वृद्धी आणि उद्योजकीय मनोवृत्ती (Entrepreneurial Mindset) निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी सत्रे आयोजित करण्यात आली. या सत्रांमुळे नवउद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढून उद्योग क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले प्रशिक्षणादरम्यान शासनाच्या विविध उद्योजकता व स्वावलंबन योजनांची माहिती, व्यवसाय विस्ताराचे मार्ग आणि आर्थिक साहाय्याच्या संधीबाबत सविस्तर जागृती करण्यात आली.

'अमृत' या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचे "रायगड जिल्हा" व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे व एमसीईडी चे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांनी सांगितले की, "या प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना रोजगारनिर्मिती, स्वावलंबन आणि उद्योगविकासाच्या दिशेने प्रेरित करणे हे आमचे प्रमुख उहिष्ट आहे. पुढील काळातही अज्ञा प्रशिक्षण कार्यक्रमांची शृंखला राबविण्यात येईल.

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत