फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी
अलिबाग,दि.14 (जिमाका):- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2022, माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीपासून आचारसंहिता अंमलात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत, परिमंडळ-2 मधील पनवेल तहसिल विभागांतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेरणे ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून या निवडणुकीत एकूण 04 प्रभागांमध्ये सरपंच पदाकरीता 02 सदस्य तसेच 11 सदस्य पदांकरिता एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवित असून एकूण 01 इमारतीमधील 04 बुथवर दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 07.30 ते 17.30 वा. च्या दरम्यान मतदान होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी दि.17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08.00 वा. पासून सुरु होणार असून मतमोजणी तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे ...