किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष मोहीम शेतकऱ्यांनी क्रेडीट कार्डचा फार्म भरुन देण्यासाठी सहकार्य करावे

 

अलिबाग,दि.13(जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड आवश्यक आहे. याकरिता दि.18ऑक्टोबर 2022 रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक असून शेतकऱ्यांना ज्या बँकेत सन्मान योजनेची रक्कम जमा होते, त्या बँकेत फार्म भरुन देण्याचे आहे. त्यामुळे ज्याच्यांकडे कार्ड नाही अशा शेतकऱ्यांनी सन्मान योजनेची रक्कम ज्या बँकेत जमा होते त्या बँकेत फार्म फरुन द्यावयाचे आहेत. यासाठी दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून कृषी सहाय्यकांनी आपल्या गावात शेतकऱ्यांकडून फार्म भरून घेवून दत्तक बँकेत जमा करावयाचे आहेत, तसेच शेतकऱ्यांनी क्रेडीट कार्डचा फार्म भरुन देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत