आपला महाराष्ट्र बाल कामगार मुक्त
12 जून- बाल कामगार मुक्त दिनानिमित्त लेख आपला महाराष्ट्र बाल कामगार मुक्त बालकामगार या विषयाने समस्त मानव जातीला अंतर्मुख केलेले आहे. बालकामगार ही एक जटील समस्या असून त्याचे दुष्परिणाम समाजातील प्रत्येक घटकास भोगावे लागत आहेत. आजचे बालक ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. बाल कामगार या शब्दामध्ये बालक काम व श्रम या तीन शब्दांचा समावेश आहे. कोणतीही व्यक्त्ती 14 वर्षापेक्षा वयाने कमी आहे अशा व्यक्तीस बाल कामगार कायद्यान्वये बालक संबोधले जाते. समाजामध्ये सर्वसाधारणपणे काम आणि श्रम या गोष्टींना समाज मान्यता आणि महत्व असले तरी देखील बालकांच्या संदर्भात तो शाप ठरला आहे. नफेखोर दृष्ट प्रवृत्तीचे संस्था मालक स्वत:च्या फायद्यासाठी बालकांना वेठीस धरुन अत्यंत कमी मोबदल्याचे स्वरुपात आर्थिक व शारीरिक पिळवणूक करुन त्यांच्या असहाय्यतेचा पुरेपूर फायदा घेतात. याचे मुळ कारण पालकांची निरक्षरता, अज्ञान आणि गरिबी. त्यावर मात करण्यासाठी प्रत्येक बालकाला शाळेत शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. बालकाच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून न घेता...