महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे
महिला संरक्षण कायदा अधिक महिलांपर्यंत पोहचणे आवश्यक --- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.गोटे अलिबाग(जिमाका), दि.9:- महिला संरक्षण विषयक असलेले कायदे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचवून योग्य त्यावेळी त्यांना त्याचा लाभ मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद रायगडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयक कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या उदघाटनाच्या कार्यक्रमाला पोलिस उप अधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे,जेष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या ॲड.निहा राऊत, ॲड.महेश ठाकूर तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना, डॉ. ...