शेतीसंबंधी वाहने, मान्सूनपूर्व कामे व वैद्यकीय कामांसाठी वापरली जाणारी वाहने व त्यासंबंधीच्या उपकरण दुरुस्ती कामांची सेवा/ दुकाने/प्लांट सुरु ठेवण्यास जिल्हा प्रशासनाची परवानगी मात्र सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेतच
अलिबाग, जि. रायगड, दि.1 (जिमाका) : राज्यात वाढत्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आदेश जारी करण्यात आलेले आहेत. शासकीय यंत्रणांमार्फत करण्यात येणारी तसेच खाजगी प्रकारची मान्सूनपूर्व कामे करण्याची व शेतीसाठी आवश्यक असणारे ट्रॅक्टर, टिल्लर व इतर शेती विषयक उपकरणे तसेच कोविड विषाणूचा प्रादूर्भावाच्या अनुषंगाने बाधित व्यक्तींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वाहनांची तसेच ऑक्सिजन वाहन करणारी वाहने व अनुषंगिक उपकरणांची दुरुस्तीची आवश्यकता भासत आहे. याशिवाय सद्य:स्थितीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशामुळे आपत्कालीन परिस्थितीत शेतीसंबंधी वाहने, मान्सूनपूर्व कामे व वैद्यकीय कामांसाठी वापरली जाणारी वाहने तसेच उपकरणांच्या दुरुस्तीची कामे विचारात घेता काही सेवा/ दुकाने/प्लांट सुरु ठेवणे आवश्यक आहे. ...