माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'महाराष्ट्र वार्षिकी 2018' संदर्भग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भग्रंथ नवीन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. या संदर्भग्रंथात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदि घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे. या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात केला आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, आजवरचे विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती व उपसभापती, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य यांची यादी, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्...