पनवेल व पाली-सुधागड येथे मुलींसाठी मोफत वसतीगृह सुविधा
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14:- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थींनींकरीता अनुसूचित
जाती मुलींच्या शासकीय वसतीगृह, पनवेल-सेक्टर-10,प्लॉट नं.21,ग्रीन पार्क सोसायटी
समोर,पनवेल तसेच पाली सुधागड,मधली आळी,राम मंदीर रोड,तळ्याच्या
शेजारी, पाली सुधागड या शासकीय वसतीगृहात ऑफलाईन प्रवेशाकरिता वसतिगृहात
प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देणेत आले आहेत. वसतिगृहात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी
वसतिगृहात येऊन प्रवेश अर्ज घेवून नाव नोंदणी करावी व भरलेले प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह
वसतिगृहात विहीत वेळेत जमा करावे.
वसतीगृहात
निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच अभ्यासाकरीता लागणारी
वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखन साहित्य् विनामूल्य् पुरविले जाते. भत्ता दिला
जातो. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून दरमहा रु.सहाशे निर्वाहभत्ता
दिला जातो.
शालेय/महाविद्यालयीन
विद्यार्थिनींना गणवेशाचे दोन संच, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो. या व्यतिरिक्त
संगणक, ग्रंथालय सुविधा,क्रीडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशासाठी अटी
प्रवेशपात्र विद्यार्थिनींच्या
पालकांचे सर्व मार्गांनी मिळून वार्षिक उत्पन्न् अनु. जाती, अनु. जमाती
विद्यार्थ्यांकरिता रु.2 लाख चे आत व
विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय,विशेष मागास प्रवर्ग,
विद्यार्थ्यांकरीता रुपये रु.1 लाख चे आत असावे.ऑफलाईन प्रवेश अर्जासोबत आवश्यक
असलेली पुढील कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत तहसिलदार
यांचे सहिचा सन 2018-19 मधील उत्पन्नाचा दाखला व जातीचे मुलकी अधिकाऱ्याचे
प्रमाणपत्र व मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक व आधारकार्ड, सत्यप्रत जोडणे
आवश्यक आहे. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतीगृह प्रवेश अर्ज हे
वसतीगृहात उपलब्ध करणेत आलेले आहेत.
तरी
अधिक माहितीकरिता गृहपाल श्रीमती एम.जे.नरहरे, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह
पनवेल व पाली यांचेशी वरील पत्त्यावर संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment