गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी
रायगड(जिमाका)दि.21:- दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाचे अनुषंगाने गणेशभक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्याकरिता खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे या कालावधीत दोन्ही (पुणे व कोकणमार्गे) मार्गावर प्रचंड प्रमाणात बाहतुकीची वर्दळ वाढते. याकरिता गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी इ. वाहने) अशा वाहनाच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी लागू केली आहे. दि.23 ऑगस्ट 2025 रोजी 00.01 वाजेपासून ते दि.28 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 23.00 वाजेपर्यंत, दि. 31 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यत आणि दि. 02 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 वाजेपासून ते रात्री 23.00 वाजेपर्यंत तसेच दि. 06 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 08.00 नंतर ते दि. 07 सप्टेंबर 2025 रोजी 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सर्व वाह...