कर्जत येथील 'रक्षा सामाजिक विकास मंडळाचा' पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान
अलिबाग,जि.रायगड,दि.19 (जिमाका):- जगभरामध्ये जीवघेण्या करोना विषाणूची परिस्थिती असून,जेथे नागरिक घराबाहेर पडायला घाबरत होते अशा महाड येथील तारीख गार्डन या इमारत दुर्घटनेच्या वेळी आपत्तीमध्ये सापडलेल्या व्यक्तींना नि:स्वार्थपणे माणुसकीच्या भावनेतून सहकार्य करण्यास आलेल्या बचावपथकांना, विविध संस्थांना व व्यक्तींना पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार सुरेश काशिद, तहसिलदार सतिश कदम यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात काल दि.18 सप्टेंबर राेजी एका छोटेखानी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये रक्षा सामाजिक विकास मंडळाचे प्रतिनिधी म्हणून श्री.अमित गुरव, सुमित गुरव यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील महाड तालुक्यातील काजळ...