सीईटी परीक्षा सुयोग्य पध्दतीने व्हावी यासाठी योग्य ते नियोजन करावे -- निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे
सीईटी परीक्षा सुयोग्य पध्दतीने व्हावी यासाठी योग्य ते नियोजन करावे -- निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे अलिबाग दि. 15:- (जिमाका) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता एमएच-सीईटी-2017 दि.11 मे 2017 रोजी होणार असून ही परीक्षा जिल्हयात नियोजनबध्द पध्दतीने व्हावी यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे दिल्या. यावर्षाची एमएच-सीईटी-2017 परीक्षा सुव्यवस्थित पार पडावी यासाठी नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत...