सीईटी परीक्षा सुयोग्य पध्दतीने व्हावी यासाठी योग्य ते नियोजन करावे -- निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे
सीईटी परीक्षा सुयोग्य पध्दतीने
व्हावी
यासाठी योग्य ते नियोजन करावे
-- निवासी उपजिल्हाधिकारी
किरण पाणबुडे
अलिबाग दि. 15:- (जिमाका) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या
प्रवेशाकरिता एमएच-सीईटी-2017 दि.11 मे 2017 रोजी होणार असून ही परीक्षा जिल्हयात नियोजनबध्द
पध्दतीने व्हावी यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी योग्य ते नियोजन करावे अशा
सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे दिल्या.
यावर्षाची एमएच-सीईटी-2017 परीक्षा
सुव्यवस्थित पार पडावी यासाठी नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात
आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. अजित गवळी, तहसिलदार महसूल जयराज देशमुख, तंत्रशिक्षण विभागाचे जिल्हा संपर्क अधिकारी
संजय खोब्रागडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित
होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाणबुडे पुढे म्हणाले की, दि.11 मे 2017 रोजी होणाऱ्या
या परीक्षेच्या केंद्रांवर योग्य तो पोलीस बंदोबस्त देण्यात यावा.या दिवशी विद्युत
पुरवठा अखंड राहील याची दक्षता घ्यावी.प्रत्येक परीक्षा केंद्रावर लाईनमनची नेमणूक
करावी. व तसे परीक्षा विभागाला कळवावे.वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन द्यावी तसेच परीक्षेच्या
संदर्भात काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. अशा सूचना
तयांनी यावेळी दिल्या.
रायगड जिल्हयात एकूण 21 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेसाठी
8 हजार 327 विद्यार्थी बसणार आहेत. असे जिल्हा संपर्क अधिकारी संजय खोब्रागडे यांनी
यावेळी सांगितले.
0000000
Comments
Post a Comment