औद्योगिक आवेदनपत्रधारक घटकांनी डेटा अपडेट करावा - महाव्यवस्थापक श्री.हरळय्या
अलिबाग,दि.04 (जिमाका):- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने दि.25 मार्च 2021 पासून आय.ई.एम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित “ जी2बी ” पोर्टल ( http://services.dipp.gov.in/ims ) सुरू केले आहे. एका आय.ई.एम कंपनी व्यवसाय घटकाच्या नावाने त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आय.ई.एम जारी केला जात आहे. याकरिता अर्जदाराने पोर्टलवर लॉग-इन करून त्यांच्या आय.ई.एम संदर्भात डेटा अपडेट किंवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी दि.15 जुलै 2021 पासून “ जी2बी ” पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाइन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्यूटोरियल “ जी2बी ” पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत. तरी संबंधित आय.ई.एम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकांमध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आय.ई.एम धारकांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर पुन:श्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून अशा सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी करताना अर्जदारांना ए...