डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार सन २०२२-२3 साठी अर्ज सादर करावेत
रायगड,दि.19(जिमाका):- “ डॉ . बाबा साहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार ” आणि “ डॉ . एस . आर . रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ( ग्रंथमित्र ) पुरस्कार ” सन 2022-23 च्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये , कार्यकर्ते व सेवक यांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि. 22 जानेवारी ते दि.09 फेब्रुवारी2024 पर्यंत तीन प्रतीत जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत , असे आवाहन प्र . ग्रंथालय संचालक , ग्रंथालय संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई श्री . अशोक मा . गाडेकर यांनी केले आहे . महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा , ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून द्याव्यात , वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “ डॉ . बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्का...