दर्जेदार सेवा हा ग्राहकांचा हक्क -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी
अलिबाग,जि.रायगड,दि.24 (जिमाका) - ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी हा त्यांचा हक्क आहे. यासाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण होणे आवश्यक असून त्यासाठी ग्राहक चळवळीतील शासकीय व अशासकिय सदस्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. राज्य परिवहन आगार अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन-2019 निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष रविंद्र नगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार सचिन शेजाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र रामसिंग राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, विभाग नियंत्रक श्रीम.अनघा बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर...