ओबीसी महामंडळ कर्जवसूलीसाठी दोन टक्के व्याज सवलत
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7:- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत (ओबीसी महामंडळ) विविध लाभार्थ्यांना देण्यात आलेले कर्ज वसूलीसाठी महामंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. येत्या 31 मार्च अखेर थकित मुद्दल व व्याज एकरकमी भरल्यास थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत देण्यात येणार, असल्याचे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्हा व्यवस्थापक एन. व्ही नार्वेकर यांनी कळविले आहे. यासंदर्भात शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्हा कार्यालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त् आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांचे जिल्हा कार्यालय, रायगड या कार्यालयामार्फत विविध कर्ज योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील वितरीत कर्जाची एकूण थकीत रक्कम 37.94 लक्ष रुपये इतकी आहे. कर्जवसूलीसाठी थकीत लाभार्थी, त्यांचे जामिनदार, हमीपत्र,पगारपत्र...