बेरोजगारांच्या सेवा संस्थांकडून कंत्राटी कामांचे प्रस्ताव मागविले


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3:- बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने  रोजगार व स्वयंरोजगार विभाग, जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यांत आली आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांकडून या सोसायट्यांना तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी काम वाटप समितीकडे पत्रे प्राप्त झाली आहेत. ज्या सेवा सोसायट्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग या कार्यालयाकडे नोंदणीकृत झाल्या आहेत अशा संस्थांनी ही कंत्राटी कामे मिळण्यासाठीचे प्रस्ताव बुधवार दि.10 रोजी सायं.5 वाजेपर्यंत सादर करावेत. अपूर्ण माहिती असलेले व उशीरा प्राप्त झालेले अर्ज अपात्र ठरविण्यात येतील, असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान