थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे
रायगड,(जिमाका) दि.13:- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. त्या लाभार्थींना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात आली होती. परंतु विहित मुदत संपून गेली असतानादेखील बऱ्याच लाभार्थींनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड अद्याप केलेली नाही त्या सर्व थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व थकीत व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे, जेणेकरुन भविष्यात होणारी संभावित कायदेशीर कार्यवाही टाळावी असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ रायगड-अलिबाग गंगाधर डोईफोडे यांनी केले आहे. थकीत लाभार्थींनी कर्ज खाते बंद केल्यास महामंडळाच्या सध्या सुरु असलेल्या नवीन आकर्षक बिनव्याजी रु.15 लक्ष पर्यंत कर्जाच्या योजनेमध्ये लाभ घेता येईल. ०००००००