एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह --जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड जिमाका,दि.31-- महसूल विभागाच्या वतीने राज्यात एक ऑगस्ट रोजी 'महसूल दिन 'साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा सप्ताह शुक्रवार (दि.1) ते गुरुवार (दि. 7 ऑगस्ट) दरम्यान असणार आहे. या सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. महसूल सप्ताह 1 ऑगस्ट रोजी 'महसूल दिना'निमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि निवृत्त महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार होईल. याच दिवशी विविध प्रमाणपत्रांचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. 2 ऑगस्ट: अतिक्रमण नियमानुकूल करणार 31 डिसेंबर 2011 पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र नागरिकांना त्यांच्या घरांचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. 3 ऑगस्ट: शेत रस्त्यांचे वाद मिटवणार 'पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना' अंतर्गत पाणंद आणि शिवपांदण रस्त्यांवरील वाद मिटवण्यासाठी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर दोन अपीलनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. प्रत्येक शेताला 12 फुटांचा रस्ता मिळेल आणि त्यांना क्रमांक दिले जातील. रस...