शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन कोविड-19 लसीकरण मोहीम यशस्वी करावी --पालकमंत्री कु.आदिती तटकरे
वृत्त क्रमांक :- 23 दि.08 जानेवारी 2021 अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- राज्यात कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच सुरु होणार आहे. त्या अगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम म्हणून सर्व शासकीय रुग्णालयांमधून ड्राय रन घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्ली पंचतन येथे भेट देऊन या ड्राय रन ची पाहणी केली. शासनाच्या आदेशानुसार कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला आजपासून सुरूवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रन्टलाईन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड-19 लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य यंत्रणेलाही लसीकरण मोहिमेची परिपूर्ण तयारी करण्याबाबतचे निर्देश दिले असून रायगड जिल्ह्यासाठी 5लाख लस दाखल होणार असून त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, बोर्ली पंचतन ग्रामीण