लॉकडाऊन काळात पात्र लाभार्थ्यांना मिळणार मोफत अन्नधान्य तसेच शिवभोजन केंद्रावरून मोफत जेवण
अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास प्रतिबंध व्हावा, याकरिता महाराष्ट्र राज्यामध्ये टाळेबंदी तसेच संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहाय्यातर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंब योजनेच्या सुमारे 7 कोटी लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत अन्नधान्य (गहू व तांदूळ) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे 17 लक्ष लाभार्थ्यांना होणार आहे. या शासन निर्णयानुसार रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता प्रति शिधापत्रिका 35 किलो अन्नधान्य (तांदूळ 25 किलो व गहू 10 किलो) मोफत वितरण करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 05 किलो अन्नधान्य (तांदू...