स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न
रायगड-अलिबाग,दि.21(जिमाका ) :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत (दि.20/01/2026) रोजी आदिवासी वाडी, मेंदडीकोंड, ता.म्हसळा येथे मतदार जनजागृती रॅली कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे व शंभर टक्के मतदान साध्य करणे हा होता. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती म्हसळा श्री.साबळे, वरिष्ठ विस्तार अधिकारी पंचायत समिती म्हसळा अरविंद मोरे, झोनल ऑफिसर मेंदडी आनंद घरत, तसेच संपूर्ण स्वीप समिती उपस्थित होती. रॅलीची सुरुवात मार्गदर्शकांच्या उपस्थितीत करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन “ माझे मत – माझा हक्क ” , “ प्रत्येक मत अमूल्य आहे ” , “ लोकशाही मजबूत करा – मतदान करा ” अशा घोषणा देत जनजागृती केली. मार्गदर्शकांनी मतदारांना मतदानाचा अधिकार, मतदार नोंदणी प्रक्रिया, EVM व VVPAT बाबत माहिती, तसेच...