Posts

Showing posts from March 15, 2026

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

    रायगड-अलिबाग,दि.18:-   सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरगुती एलपीजी गॅस तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संभाव्य अडचणींच्या पार्श्वभूमीवर तत्काळ मदत उपलब्ध व्हावी, यासाठी तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी गॅस संदर्भातील तक्रारी व अडचणींसाठी संबंधित तालुक्यांमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील तालुकानिहाय संपर्क अधिकारी, पदनाम व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे :- पनवेल – श्रीम. आश्विनी धनवे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९९६७८९७४४०, उरण – महेश पाटील (नायब तहसिलदार) – ७७७५९९३११३, कर्जत – रवींद्र दळवी (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९०४९१८६२९६, खालापूर – मनोज पवार (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७४०३३९७७७७, अलिबाग – हर्षल देशमुख (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ७८८९७४०६५२, मुरुड – महेंद्र गांगुर्डे (पुरवठा निरीक्षण अधिकारी) – ९०११९६१२३४, पेण – सतीश शिंद...

मार्च अखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार खरेदी-विक्री व्यवहारांसाठी मोठा दिलासा

रायगड-अलिबाग,दि.17(जिमाका) :- आर्थिक वर्षाचा शेवट आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारी मालमत्ता खरेदी-विक्रीची गर्दी लक्षात घेता, राज्य सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यातील चार सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही राज्यातील सर्व दुय्यम निबंधक आणि सह जिल्हा निबंधक कार्यालये पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षक श्री रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.       शासकीय परिपत्रकानुसार,  सुट्ट्यांच्या  २६ मार्च २०२६,  २८ मार्च २०२६,  २९ मार्च २०२६,  ३१ मार्च २०२६ (आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस) दिवशी दस्त नोंदणीची कामे सुरू राहतील.     मार्चअखेर असल्याने अनेक नागरिक आपले प्रलंबित खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मालमत्ता खरेदी करण्याकडे लोकांचा कल मोठा असतो, त्यामुळे दस्त नोंदणीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुद्रांक शुल्काचे (Stamp Duty) उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.      या निर्णयामुळे राज्यातील दुय्यम निबं...

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

    रायगड-अलिबाग,दि.17(जिमाका):-  डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठातर्फे येत्या 18 मे रोजी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त आयोजित शानदार कार्यक्रमात उत्तर व दक्षिण कोकण विभागातील एका नाविन्यपूर्ण शेतकऱ्यास शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याचे कुलगुरु डॉ. संजय भावे यानी जाहीर केले असून त्यासाठी पात्र शेतकन्यांनी विद्यापीठाच्या संबंधित संशोधन केंद्र किंवा कृषि विज्ञान केंद्र किंवा संचालक, विस्तार शिक्षण यांच्या कार्यालयाकडे सहभाग नोंदवावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ.राजेश ठोकळ यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेत प्रयोगशील आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार देण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाद्वारे येत्या 18 मे रोजी निवड झालेल्या शेतकऱ्याचा भव्य समारोहात सत्कार करण्यात येणार आहे. जे शेतकरी वैज्ञानिक पध्दतीने शेतीचे व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, विद्यापीठ शिफारसींचा अवलंब, नाविन्यपूर्ण उपक्रम रा...

महिला स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शनाचे आयोजन

    रायगड-अलिबाग,दि.17(जिमाका):- ग् रामविकास व पंचायत राज विभाग उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसहायता गटांच्या उत्पादन विक्री व प्रदर्शन 2026 चे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि.20 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता समुद्र किनारा, अलिबाग येथील मैदानावर होणार आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि.प.रायगड श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले तसेच रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. दि.20 मार्च  ते दि.24  मार्च 2026 सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वा. या कालावधीत महिला स्वयं सहाय्यता गटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री विशेष आकर्षण असणार ...