शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठयांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न

रायगड (जिमाका) दि. 1:- जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात देण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी तसेच गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठयासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले. जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी राज्य पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ.शैलेश कानडे, रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे,प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भालेराव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण निर्मला कुचीक, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद चौधरी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ बास्टेवाड यांनी ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे प्राधान्याने हाती घ्य...