डॉ.झाकीरहुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत
रायगड-अलिबाग,दि.30(जिमाका):- जि ल्ह्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ.झाकीरहुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2025-26 अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र मदरशांना रु.10 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. जिल्ह्यातील मदरसांनी सन-2025-26 या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह सहपरिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग यांच्याकडे दि.14 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती रायगड-अलिबाग उमेश सुर्यवंशी यांनी केले आहे. सदर तारखेनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. 000000