म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

रायगड दि.17 (जिमाका) :- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी रु.43 कोटी इतक्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. म्हसळा येथे आयोजित कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, खासदर सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या प्रकल्पाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान प...