03 मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन

 

रायगड दि.14(जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात रविवार दि.03 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पालिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून या माहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस देण्यात येणार आहे.  0 ते 05 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा जादा डोस पाजून लसीकरण मोहिम कार्यक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात, राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात नियोजन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.मनिषा विखे यांच्यासह सर्व तालुक्यातील आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. शिर्के म्हणाले की, संपूर्ण शासकीय यंत्रणा पोलिओ डोस देण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातील 55 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भगातील बुथ उभारण्यात येणार असून या बुथवर या दिवशी सकाळी 8.00 ते सांय 5.00 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा डोस देण्यात येणार आहे.

रायगड जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 73 हजार 854 त्याकरीता ग्रामीण भागात 2 हजार 134 बुथ व शहरी भागात 143 बुथ असे एकूण 2 हजार 277 बुथवरर पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वेस्थानक इत्यादी ठिकाणी सुध्दा पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरीता 5 हजार 67 आरोग्य कर्मचाऱ्यांची बुथवर नेमणूक करण्यात आली असून अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खाजगी संस्थाचा देखील यामध्ये सहभाग करुन घेण्यात आला आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी पोलिओ लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे.


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज