जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरीता रिक्तपदे अधिसूचित करण्याचे आवाहन
अलिबाग,दि.20 (जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांचेमार्फत दि . 27 ते दि.29 जानेवारी, 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” च्या निमित्ताने ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासा़ठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे वेबपोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in वर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल / अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणा-या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती ...