शेतकरी सन्मान व मार्गदर्शन केंद्रांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-कृषिमंत्री ना.दादाजी भुसे

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23- जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी, समस्याचे निवारण करणे,योग्य सल्ला देणे व तोही आदर आणि सन्मानपूर्वक यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्षाची सुरुवात करण्यात आली असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन राज्याचे कृषि,माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज येथे केले. जिल्हा नियोजन भवन, अलिबाग येथील सभागृहात आयोजित शेतकऱ्यांना संबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जि.प.सदस्य सुरेंद्र म्हात्रे, राजा केणी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, तहसिलदार सचिन शेजाळ, वि.कृ.स.सं. ठाणे श्री. प्रमोद लहाळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडूरंग शेळके, कृषि उपसंचालक सतिश बोराडे, कृषि विकास अधिकारी श्री. लक्ष्मण खुरकुटे आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले की, शेतकरी...