जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा दि.07 जुलै पर्यंतचा प्राथमिक अहवाल जाहीर
अलिबाग, दि.08 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.07 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6.00 पर्यंतचा जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा जाहीर करण्यात आलेला प्राथमिक अहवाल याप्रमाणे- रायगड जिल्ह्यात दि.07 जुलै 2022 रोजी 125.45 मि.मी.सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस रोहा येथे 197 मिलिमीटर झाला आहे. दि.07 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6.00 च्या अहवालानुसार सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक:- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे जुना पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. अतिधोकादायक/धोकादायक इमारती धरणांबाबत: तळा तालुक्यातील वावा लघुपाटबंधारे योजना ही पूर्ण क्षमतेने भरली आहे. मुरूड तालुक्यातील अंबोली धरणात पूर्ण संचय पातळीपर्यंत साठा होवून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे. नदी पातळी:- सावित्री नदी, धोका पातळी- 6.50 मी., सध्याची पातळी-4.60 मी., कुंडलिका नदी, धोका पातळी-23.95 मी., सध्याची पातळी--23.50 मी., अंबा नदी, धोका पातळी-9.00 मी., सध्याची पातळी-7.70 मी., उल्हास नदी, धोका पा...